Posts

Showing posts from June, 2024

वर्चस्ववादाचा भस्मासुर : आणीबाणी १९७५ [ भाग १ : प्रवेश ]

Image
  Image Source २५ जून १९७५ ची ती काळीरात्र भारतीय लोकशाहीसाठी काळरात्र ठरली. सहीच्या एका फटकाऱ्याने तिच्यावर असा काही आघात केला गेला की ; आज ४९ वर्षांनंतरही त्या आघाताचे व्रण स्पष्ट दिसतात. लोकशाहीचा पुरस्कार करणारा भारतीय जनता , थकून भागून सुख झालेली असताना त्या जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी असणाऱ्या , तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जूनची मध्यरात्र होत असताना भारतामध्ये आणीबाणी घोषित केली.... पण असं नेमक घडलं तरी काय ; ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये आणीबाणी लागू करावी लागली ? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न आपण या लेखमालेमध्ये करणार आहोत. प्रारंभी भारतीय संविधानानुसार कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू होऊ शकते याचा आढावा आपण घेऊ. भारतीय संविधान भाग १८ मधील कलम ३५२ अनुसार ,   भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता ज्यामुळे धोक्यात आली आहे- मग ती युद्धामुळे असो , परचक्रामुळे असो किंवा सशस्त्र बंडामुळे असो - अशी गंभीर आणीबाणी अस्तित्वात आहे याबाबत जर राष्ट्रपतींची खात्री झाली तर त्यांना उद्घोषणेद्वारे तशा आशयाची घोषणा करता येत...